Skip to content Skip to footer

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत नेमकं काय शिजतंय

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत नेमकं काय शिजतंय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देऊन 11 दिवस उलटले तरी त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपालांच्या अडमुठेपणावर सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राज्यपालांनी हा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत काही जणांनी कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि राज्याचे अँडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती, असे समजते. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांच्या या अडमुठेपणावर राज्यातील जनतेनेच टीकास्त्र झोडलेलं आहे.

मात्र आता विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना भाजपाच्या नेत्यांचा राजकीय फायद्यासाठी काड्या घालण्याचा प्रकार अजूनही चालूच आहे. याची प्रचिती चंद्रकांत पाटील, राम कदम, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

Leave a comment

0.0/5