Skip to content Skip to footer

विविध विषयांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक!

विविध विषयांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. राज्यातल्या प्रमुख शहरातील वाढता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा महाविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा आणि पावसाळ्यातील पुर्व तयारीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या बौठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह महाआघाडीमधील मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे. देशासह राज्यातही कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिकमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. शिवाय आता लॉकडाउनचा पाचवा टप्पा आणखी शिथिल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात येत आहे. तसेच या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचेही निर्णय घेण्यात येईल.

Leave a comment

0.0/5