Skip to content Skip to footer

डबेवाल्यांसाठी संजय दत्त आला धाऊन, मुख्यमंत्र्यांना केली विनंती….!

डबेवाल्यांसाठी संजय दत्त आला धाऊन, मुख्यमंत्र्यांना केली विनंती….! 

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशात अनेक कामगार वर्गाचे अतोनात हाल होताना दिसत आहे. एकीकडे लॉकडाऊनची चिंताजनक परिस्थिती असताना दुसरीकडे कामगारांचे मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थतीच्या मुंबईतील डबेवाल्यांना सुद्धा झळा सोसाव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या मदतीला आता सिने अभिनेता संजय दत्त सरसावला आहे. राज्यांमधील मजुरांसोबतच मुंबईतील डबेवाल्यांचा देखील विचार करावा, अशी विनंती अभिनेता संजय दत्त याने केली आहे. डबेवाल्यांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

“डबेवाले गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांची सेवा करत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत आपण त्यांना मदत करायला हवी”,अशा आशयाचे ट्विट संजय दत्तने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना देखील या ट्विटमध्ये त्याने टॅग केले आहे. संजय दत्तचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांमध्ये शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Leave a comment

0.0/5