Skip to content Skip to footer

चंद्रकांतदादा सुट्टीला फक्त कोल्हापुरात येतात, तर काहींचा अस्तित्वाचा सवाल आहे ! – मंत्री सतेज पाटील

चंद्रकांतदादा सुट्टीला फक्त कोल्हापुरात येतात, तर काहींचा अस्तित्वाचा सवाल आहे ! – मंत्री सतेज पाटील

दूध दरवाढ समर्थानात भारतीय जनता पक्षाने राज्यातील विविध भागांमध्ये आज आंदोलन केले होते. याच आंदोलनावर बोलताना राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजपा नेते धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला. “भाजपाचे कोल्हापुरातील आंदोलन म्हणजे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न आहे”, असा टोला मंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार, भाजपा नेते धनंजय महाडिक यांना लगावला.

तर चंद्रकांतदादा पाटील हे मूळचे पुण्याचे मात्र ते सुट्टीसाठी कोल्हापुरात येतं असतात, असा टोला सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. ‘काहीतरी अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे. या आंदोलनाला भाजप नेत्यांनीच फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले. तसेच हे आंदोलन सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले आंदोलन आहे’, असे सुद्धा सतेज पाटील यावेळी बोलले.

Leave a comment

0.0/5