Skip to content Skip to footer

आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या प्रवर्गाला 25 टक्के आरक्षण देण्याचा विचार!

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खुल्या प्रवर्गासाठी 25 टक्के आरक्षण देण्याचा विचार केला जात आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ऍट्रॉसिटी कायद्यात कुठलाच बदल केला जाणार नाही, तसेच ज्यांचा या कायद्याला विरोध आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल तसेच  असल्याचेही त्यांनी सांगितले. आठवले झारखंडच्या दौर्‍यावर आहेत, रांचीमध्ये ते बोलत होते.

रालोआच्या बैठकीत खुल्या प्रवर्गाला आरक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे. ती 75 टक्क्यांपर्यंत नेऊन 25 टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील गरीबांना देण्याचा विचार सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आंतरजातीय लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी 25 हजारांच्या ऐवजी 1 लाख रुपये देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र आपण सर्व मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2019 मध्ये मोदीच पुन्हा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5