Skip to content Skip to footer

ते सध्या काय करतात? चंद्रकांत खैरे

ते सध्या काय करतात?

चंद्रकांत खैरे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. यांत काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. गेली अनेक वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेल्या नेत्यांना यंदा पराभूत झाल्यामुळे संसदेत जाता आलं नाही. “ते सध्या काय करतात?” या आमच्या सदरात आम्ही आपल्यासमोर महाराष्ट्रातील दिग्गज खासदार म्हणून काम केलेले परंतु यंदा पराभूत झालेले उमेदवार सध्या काय करतात याची माहिती मांडणार आहोत. आज आपण जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या संभाजीनगर मतदारसंघाचे केवळ ४८०० मतांनी पराभूत झालेले आणि तब्ब्ल २० वर्षे खासदार म्हणून कारकीर्द गाजवलेले चंद्रकांत खैरे सध्या काय करतात?

-संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असून सुद्धा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी फोडलेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आणि एमआयएमचा विजय झाला ही गोष्ट खैरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली. खैरेंनी गद्दारांना तसेच एमआयएमने काही चुकीचं केल्यास इम्तियाज जलील यांना सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत जखमी झालेल्या पण चवताळलेल्या वाघाप्रमाणे प्रतिक्रिया दिली.

-खैरेंप्रमाणेच शिवसैनिकांनाही हा पराभव जिव्हारी लागला. खैरेंना न्याय देण्यात यावा अशी भावना व्यक्त होत असतानाच त्यांना केंद्रीय मंत्रिपद व राज्यसभा देण्यात यावी किंवा राज्य मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं अशी मागणी जोर धरू लागली. या मागण्यांवर वरिष्ठ पातळीवर सुद्धा चर्चा झाल्याचं समजतं.

हिंदू नामर्द नाही, शिवसेनेने इम्तियाज जलील यांना ठणकावले……

-पराभूत झाल्यानंतर काही दिवसातच खैरेंनी मातोश्री गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंनी “खैरे तुम्ही जिगरबाजपणे लढलात’ अशा शब्दात खैरेंना धीर दिला. यावेळी मीडियाशी बोलताना खैरे यांनी उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमधील सर्व घडामोडींची माहिती असून यावर आत्ता बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली.

-त्यानंतर आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून संभाजीनगमधील मतदारांचे आभार मनात कृतज्ञता व्यक्त केली.

-त्यांनतर चंद्रकांत खैरे यांनी दुष्काळ प्रश्नावर कार्यरत होत चार छावणीस भेट दिली.

-शिवाय समृद्धी महामार्ग पाहणी दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिली.

संभाजीनगर शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा खैरे सक्रिय दिसले. शिवसैनिकांच्या बैठका, रॅली, मेळावे आदी कार्यक्रम घेत शिवसेना ऍक्टिव्ह ठेवण्यात त्यांनी भूमिका बजावली.

-महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान येथील वाघाच्या बछडयांच्या नामकरण कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

-संभाजीनगर येथील एका रहिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याने त्या महिलेने खैरेंची भेट घेतली असता खैरेंनी त्या महिलेस आर्थिक मदत, पाण्याची टाकीन तसेच धान्य दिले. सदर महिलेने अनेकांकडे व्यथा मांडून कोणीही मदत केली नव्हती त्यामुळे खैरेंनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या भरीव मदतीमुळे महिलेचे डोळे पाणावले.

-यासह खैरेंनी जिल्हा दुष्काळ उपाययोजना आढावा बैठकीला उपस्थिती लावत दुष्काळ उपाययोजनांचा आढावा घेतला.

-शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत जालना येथे दुष्काळग्रस्तांना मदत वाटपाच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात खैरेंनी उपस्थिती लावली. यावेळी दुष्काळग्रस्तांना मोफत पाण्याच्या टाका, धान्य, चारावाटप करण्यात आले.

jalana dushkal help

-यावरून चंद्रकांत खैरे हे पराभूत झाल्यानंतर सुद्धा जोमाने कामाला लागले असल्याचं दिसत.

Leave a comment

0.0/5