Skip to content Skip to footer

छत्रपती उदयनराजे विरोधात पक्षातून टीका होताना खा. कोल्हे गप्प का? नेटकऱ्यांचा सवाल

खासदार अमोल कोल्हे यांना जेव्हा पत्रकार समूहाने शिवसेना का? सोडली याचे कारण विचारले तेव्हा मला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे साताऱ्याचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी दबाव टाकत होते म्हणून आपण शिवसेना सोडली असे धडधडीत खोटे बोलून छत्रपतींवर श्रद्धा ठेवणाऱ्या जनतेची कोल्हे यांनी सहानुभूती मिळवलेली होती आणि त्याचाच फायदा घेत शिरूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून सुद्धा आले होते. परंतु आज राष्ट्रवादी पक्षातील नेते मंडळी छत्रपती उदयराजेंवर खालच्या थराची टीका करत असताना छत्रपती गादीवर अपार निष्ठा दाखविणारे खासदार अमोल कोल्हे गप्प का?

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षतील जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी उदयराजेंवर पाण्याच्या प्रश्नावरून एकदम खालच्या थराला जाऊन टीका केली होती. “उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिसळण्यापुरताच मर्यादित आहे” अशी टीका निंबाळकरांनी केली होती. तेव्हा छत्रपतींवर आरोप होत असताना राजेंवर श्रद्धा ठेवणारे आणि त्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी सांगितले म्हणून पक्ष सोडणारे खा. अमोल कोल्हे शांत का? का आपल्या नेत्यांना खडसावून जाब विचारला नाही, असाच प्रश्न सध्या नेटकरी कोल्हे यांना विचारत आहे. परंतु टीका होत असताना कोल्हे यांच्या तोंडातून आपल्या वरिष्ठ नेत्यांविरोधात चुकार शब्द सुद्धा आपल्या तोंडातून काढलेला नाही आहे. यावरून कोल्हे फक्त प्रसिद्धीसाठी छत्रपती राजेंच्या नावाचा वापर करून घेत आहे हे आता सिद्ध होत आहे.

आज पर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फक्त जातीचे राजकारण केले आहे. म्हणूनच त्यांनी उदयनराजे यांचे नाव आपल्या पक्षातून मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते . परंतु पवारांचा हा डाव खुद्द छत्रपती उदयनराजेंनी हणून पडला होता. आज त्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या स्वार्थसाठी कोल्हे यांनी छत्रपती राजेंच्या नावाचा वापर करून घेतला आहे. हेच आज कोल्हे यांच्या वागणुकीतून दिसून येत आहे. आणि ही गोष्ट आता तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलेली आहे.

1 Comment

  • वैद्य
    Posted June 17, 2019 at 7:35 pm

    कोल्हे कसला? तो तर लबाड लांडगा.

Leave a comment

0.0/5