Skip to content Skip to footer

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक – अमित शाह

मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे.

तसेच ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे. हे विधेयक मांडताना अमित शाह यांनी काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर हासुद्धा प्रदेश येतो. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच आहे अस आक्रमक विधान केले आहे. या चर्चेत कॉंग्रेसच्या नेत्यांनीही सहभाग नोंदवला यात अधीर रंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

दरम्यान, कलम ३७० हटवण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्या दृष्टीने देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आवाज उठवला. ही प्रक्रिया घटना बाह्य पद्धतीने सुरु असून जम्मू काश्मीरमध्ये सरकार नसताना देखील त्यांचे मत गृहीत धरून हे कलम रद्द केले जात असल्याचा विरोधकांकडून सांगितल जात आहे

Leave a comment

0.0/5