राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना, मुंडेंनी एकेरी शब्दात उल्लेख केला. तसेच, गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करताना पिस्तुलराव महाजन अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. काही दिवसापुरी मुंडे यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांना “पिस्तुल्या” या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती.
शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी पैठण येथून सुरूवात झाली. त्यावेळी, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, महापूराच संदर्भ देत सरकार पूरग्रस्तांसाठी किती असंवेदनशील असल्याचेही राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी म्हटले आहे. त्यातच, भोकरदन येथील सभेत बोलताना, धनंजय मुंडेंनी एकेरी भाषेत मंत्र्यांचा समाचार घेतला.
1 Comment
Omkar Ramakant Mosamkar
Very good news give by Maharashtra bulletin