Skip to content Skip to footer

नव्या वर्षात फडणवीसांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. तर भाजपा विरोधी बकावर बसले आहे. आता भाजपा मधील नाराजीचे नाट्य पण बघायला मिळत आहे. सोबतच जुने अनेक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी अनेक जन करत आहे. यामध्येच पाचच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावले होते.

सुनावणीसाठी आज कोर्टात हजर राहण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले, त्यामुळे या खटल्याची सुनावणी ४ जानेवारी होणार आहे. आता ४ जानेवारी २०२० ला फडणवीसांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.दंडाधिकारी न्यायालयाकडे १ नोव्हेंबर रोजी, याप्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. नागपूरस्थित वकील सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.

वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्य़ांची माहिती लपवण्यात आली.

Leave a comment

0.0/5