Skip to content Skip to footer

छत्रपती शाहू महाराज जिवंत असते तर हा कायदा टराटरा फाडला असता – हसन मुश्रीफ

छत्रपती शाहू महाराज जिवंत असते तर हा कायदा टराटरा फाडला असता – हसन मुश्रीफ

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याविरोधात संपुर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. या कायद्याला काही संघटना विरोध करत आहेत तर काहीजण या कायद्याचे समर्थनही करत आहेत. आज राज्य नाही तर देशातील विविध ठिकाणी या कायदयाच्या विरोधात मोर्चे निघताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यावर भाष्य केलं आहे.

शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता. हा कायदा राज्यघटनेच्या गाभ्याला धोका पोहचवणारा आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. विविध राज्यांमधले प्रादेशिक पक्ष देखील या कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने देखील CAA आणि NRC चा कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर CAA आणि NRC कायद्याविरोधात येत्या २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करणार असल्याचे म्हटलं आहे. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपलेच शब्द फिरविले

Leave a comment

0.0/5