Skip to content Skip to footer

भाजप महिला नेत्याची मुक्ताफळे म्हणे पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार

मुंबई – काल संध्याकाळी मायानगरी मुंबईच्या सीएसएमटीजवळ पादचारी पुलाचा निम्यापेक्षाजास्त स्लॅब कोसळून भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर पोहोचला असून या घटनेचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे तर दूसरीकडे, भाजपच्या एका महिला नेत्याने अकलेचे तारे तोडले आहेत. भाजपच्या नेत्या संजू वर्मा यांनी पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

 

‘टाइम्स नाऊ’च्या एका कार्यक्रमात संजू वर्मा या सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला संजू वर्मा यांनी हे नैसर्गिक संकट असल्याचे सांगितले. नंतर सरकारचा या दुर्घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी अंग काढण्याचा प्रयत्न केला. पण नंतर दुर्घटनेला त्यांनी पादचारीच जबाबदार असल्याचे संतापजनक वक्तव्य केले. संजू वर्मा यांच्या बेताल वक्तव्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका होत आहे.

Leave a comment

0.0/5