Skip to content Skip to footer

हुमन जलसिंचन प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

हुमन जलसिंचन प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील, सिंदेवाही तालुक्यातील हुमन नदीवर प्रस्तावित प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. हुमन नदी प्रकल्पाकरिता वनजमीन वळतेकरण व जलसिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रकल्पाच्या धरणाखालील एक किलोमीटर रुंदीच्या कॉरिडॉरमधील २०० हेक्टर खासगी जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावावर तसेच प्रकल्पाच्या वनक्षेत्रातून जाणाऱ्या कालव्यामुळे वन्यजीवांचे भ्रमणमार्ग खंडित होऊ नये, याकरिता कालव्याचे बांधकाम बंदिस्त पाईपलाईनद्वारे, करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखून तसेच वन्यजीवांचा भ्रमण मार्ग खंडित होणार नाही, याची दक्षता घेऊन प्रकल्पाचे काम करावे, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे , जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आयएस चहल, विदर्भ विकास महामंडळ नागपूर कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आदी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5