Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री करणार आज नाशिक जिल्ह्याचा दौरा

मुख्यमंत्री करणार आज नाशिक जिल्ह्याचा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहे. ते आज नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा आढावा बैठक सुद्धा यावेळी घेण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक घेऊन, सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून घेणार आहेत. या आढावा बैठकीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादा भुसे तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहणार आहे.

उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाल्यावर नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहे त्यामुळे या दौऱयाकडे आणि होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने महत्त्वाचे चार निर्णय घेतले. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Leave a comment

0.0/5