Skip to content Skip to footer

तेहरानमध्ये अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी शिवसेना खासदारांचे प्रयत्न

कोरोना वायरसमुळे सर्व देशात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी देशातून बाहेर गेलेले अनेक भारतीय नागरिक विविध देशात सुरक्षितेच्या कारणास्तव अडकून पडले आहेत. या व्हायरसचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला सुद्धा बसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४४ पर्यटक इराक आणि इराण परिसरात धार्मिक तीर्थक्षेत्राला गेले असता तेहरान येथे अडकून पडले आहेत. या सर्वांच्या सुटकेकरीता खासदार संजय मंडलिक यांनी तातडीने परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून या सर्वांची लवकरात लवकर तेहरान येथून सुटका व्हावी अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक बोलताना खासदार मंडलिक म्हणाले की, इराण आणि इराक मध्ये दरवर्षी हजारो धार्मिक यात्रेकरीता जात असतात. यावर्षी कोल्हापूर व परिसरातून सुमारे ४४ पर्यटक धार्मिक तीर्थेक्षेत्रासाठी साद ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तेहरानला गेले. परंतू जगात सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या भितीने विमानांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातल्याने तेहरानमध्ये सर्व भाविक अडकून पडल्याने त्यांच्या सुटकेकरीता परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे अशी माहिती खासदार मंडलिक यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5