Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला…

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला…

राज्य सरकार कोरोनावर आळा घालण्यासाठी अनेक उपाय योजना राबविताना दिसत आहे. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे.

मुंबईतील २२ वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेले आहे. तर उल्हासनगरमधील ४९ वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.

पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीतही कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही प्रमाणात लॉकडाऊन लागू केले आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात वाढत असलेल्या रुग्णांची संख्या पाहून, राज्यात आता आणखी खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5