Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जनतेची साथ, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले 245 कोटी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जनतेची साथ, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले 245 कोटी

देशात आणि राज्यात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामूळे निर्माण झालेल्या या आपत्तीवर मात करण्यासाठी जनतेने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – 19 या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत २४५ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. आज अनेक दानशूर व्यक्ती, विविध क्षेत्रातील मान्यवर, सिनेअभिनेते, कलाकार यांनी सढळ हाताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.

Leave a comment

0.0/5