कुणी कितीही आपटू द्या काही फरक पडत नाही – संजय राऊत
देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर वांद्रे स्थानकात जमा झाले होते. या घडलेल्या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
विरोधकांचे बाप, आजी आजोबा आणि अश्या १०० पिढ्या जरी मैदानात उतरल्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची संकल्पना वास्तवात येणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
विरोधी पक्ष जे राजकारण करतोय त्यांना कायमच घरी बसावे लागेल. कुणी कितीही आपटू द्या काही फरक पडणार नाही, असा खोचक टोला विरोधकांना लगावला आहे. तसेच वांद्र्याचे प्रकरणं हे मुख्यमंत्र्यांमा बदनाम करण्यासाठी रचले गेले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.