अभिनेता सुशांत शेलार यांच्याकडून चित्रपट क्षेत्रातील कामगारांना मदतीचा हात!
सध्या देशात मागील दोन महिन्यापासून लोकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. त्यातच वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे परिस्थिती अधीकच चिंताजनक होत चालली आहे. याचा फटका नोकरी करणाऱ्या कामगारांबरोबर चित्रपट क्षेत्रातील कामगारांना सुद्धा बसलेला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्वच मालिकांचे आणि चित्रपटाचे शूटिंग बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मात्र आता या कामगारांच्या मदतीला अभिनेता सुशांत शेलार धाऊन आले आहे.
लालबाग परळ या विभागात राहणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना व कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप त्यांच्या तर्फे करण्यात आले आहे. स्वतः पुढाकार घेऊन सुशांत शेलार यांनी या वस्तूचे वाटप केले आहे. याबाबत चित्रपट क्षेत्रातील विविध कलाकारांनी शेलार यांचे आभार मानले आहे. तर अभिनेता श्रेयस तळपदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेलार यांच्या कार्याचे कौतुक देखील केले आहे.