Skip to content Skip to footer

ऐश्वर्याच्या मदतीसाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी हलविली मध्यरात्री प्रशासकीय यंत्रणा….!

ऐश्वर्याच्या मदतीसाठी मंत्री आदित्य ठाकरेंनी हलविली मध्यरात्री प्रशासकीय यंत्रणा….!
              मंत्री पदावर बसलेली कोणतीही व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असली तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला उत्तर देताना किंवा त्याची दाखल घेताना कमीच आढळून आली आहे. मात्र त्याच्या उलट मंत्री आदित्य ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहावयास मिळाले आहे तसेच त्या माध्यमातून आलेले जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आदित्य ठाकरे यांनी अनेकवेळा भर दिला आहे. असाच प्रसंग पुणे येथे घडलेला पाहायला मिळाला होता.
          माझे वडील अस्वस्थ आहे…त्यांना पुण्यात आयसीयूची गरज आहे, असे ट्विट पुण्यातील एका युवतीने मध्यरात्री केले.. अन त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दाखल घेत रात्रीच्या रात्री सूत्र हलविले आणि तिच्या वडिलांना पुण्यात बेड उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्य सरकार सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर उभी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
            ऐश्वर्या पारेख या पुण्यात राहणाऱ्या युवतीने मध्यरात्री १२.४४ वाजता पुण्यात बेड मिळावा म्हणून ट्विट केले होते. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यलयाला टॅग केले होते. त्यानंतर काही वेळातच ठाकरे यांनी रिट्विट करत तिचा फोन नंबर मागितला होता आणि पुढे स्वतः पुणे आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून पारेख यांच्या वडिलांना खाजगी रुग्नालयात बेड उपलब्ध करून दिला.

Leave a comment

0.0/5