Skip to content Skip to footer

वरळीतील पब आणि बारवर कारवाई करण्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने घालून दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन हॉटेल आणि बार यांना सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र कोरोना संदर्भातील कोणत्याही नियमांचे पालन न करता मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी प्रभागातील हॉटेल्स आणि बार केयदेशीरपणे सुरु असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दाखवली होती. यावर आता संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री आणि वरळी विधानसभा मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

या संदर्भात बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्याची संपूर्ण माहिती घेऊन पुढील कडक कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.

तसेच पब असुद्या किंवा रेस्टॉरंट किंवा लोक असतील ज्यांनी मास्क नाही वापरले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही पबच्या व्हिडीओ मिळाल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडलीच तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली होती.

Leave a comment

0.0/5