Skip to content Skip to footer

गोपीनाथ मुंडे यांसाठी सीबीआय चौकशी का केली नाही? ; मंत्री पाटील यांचा भाजपाला सवाल.

गोपीनाथ मुंडे यांसाठी सीबीआय चौकशी का केली नाही? ; मंत्री पाटील यांचा भाजपाला सवाल.

भाजपने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआय चौकशी होण्याआधी तपास हा मुंबई पोलिसांकडे होता. मात्र भाजपने आघाडी सरकारवर टीका करत हा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला एक सवाल करत जोरदार टीका केली आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही? गोपीनाथ मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपाला वाटलं नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. अजिंठा येथील शासकीय विश्रामगृहात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नाथाभाऊंवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा” असे त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5