Skip to content Skip to footer

मुंबई पोलीस अत्याधुनिक सायकलद्वारे घालणार गस्त

मुंबई पोलीस अत्याधुनिक सायकलद्वारे घालणार गस्त

सध्या मुंबई पोलिसांमध्ये अत्याधुनिक सायकलची जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. आता लवकरच मुंबई पोलीस रस्त्यावर गस्त घालण्यासाठी सायकलचा वापर करताना दिसून येणार आहे. मात्र ही सायकल साधीसुधी नसून अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज असणार आहे.

मुंबईतल्या विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये या दोन सायकली दाखल झाल्या आहेत. या सायकलची वैशिष्टे म्हणजे सायकवर वाय-फाय, ब्लूटूथ आणि बॅटरी असून 35 किलोमीटरपर्यंत ही सायकल बॅटरीवर चालणार आहे.

तसेच सायकलमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सुदृढ होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या झोपडपट्टी विभागांमध्ये गस्त घालण्यासाठी या सायकलचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मत मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5