Skip to content Skip to footer

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये – सामना

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये – सामना

औरंगाबादच्या नामकरण मुद्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केल्यावर हाच मुद्दा पकडून भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला लक्ष केले होते. आता भाजपच्या या टीकेला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार हल्ला भाजपवर चढवण्यात आलेला आहे.

शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ पाकिस्तानात मंदिराची तोडफोड सुरू आहे तिथं एखादा सर्जिकल स्ट्राईकचा फुगा फोडता येईल का बघावे असे म्हणत आजचं सामनातून भाजपाल चिमटा काढला आहे.

‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे,’ असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणे मूर्खपणाचे आहे असे स्पष्ठ सामनाच्या अग्रलेखात सांगण्यात आले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.भारतीय जनता पक्षाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील असाच समज यामुळे मराठी जनतेचा होईल, पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका! महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? असा थेट सवाल शिवसेनेने भाजपला केला.

Leave a comment

0.0/5