Skip to content Skip to footer

देशवासीयांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार, केंद्र सरकारचा निर्णय

देशवासीयांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार, केंद्र सरकारचा निर्णय

नव्या वर्षात केंद्र सरकारकडून सर्व देशवासीयांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने देशवासीयांना दिलासा देणारी बातमी आज नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी दिली आहे. देशात कोरोना लस मोफत दिली जाणार की त्यावर पैसे आकारले जाणार आणि किती ? असे अनेक प्रश्न देशभरातील सर्व नागरिकांना पडला होता. मात्र याच उत्तर आज अखेर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी दिले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.

प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केले जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5