Skip to content Skip to footer

हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस पुन्हा धावणार

नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये झालेला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला आणि सीमारेषेवर सुरू असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतीमुळे हिंदुस्थान- पाकिस्तान दरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती. परंतु आता समझोता एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समझोता एक्सप्रेस उद्या म्हणजे 3 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुस्थानने घरात घुसून हल्ला केल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस रद्द केली. त्यामुळे हिंदुस्थानकडूनही समझोता एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती. यामुळे दोन्ही देशात अनेक प्रवासी अडकले होते. परंतु आता ही एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave a comment

0.0/5