Skip to content Skip to footer

कोळशे पाटील यांनी नाकारला वंचित आघाडीचा पाठिंबा……

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला संभाजी नगर मतदार संघाची जागा एमआयएम पक्षाला देऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धोका दिला असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मांडलेले आहे. त्यांनी फेसबुक पोष्ट लिहून आपली नाराजी वक्त केली आहे. कोळशे पाटील हे खासदारकीसाठी संभाजी नगर मतदार संघातून इच्छुक होते. न्या. पाटील फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, वंचित बहूजन आघाडीला दिलेला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारला आहे. मी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. सर्व गुणदोषा सहित काँग्रेस पक्ष जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखूं शकतो. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला.

मला सुरूवातीपासून काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचे कबूल केले होते. परंतु आंबेडकरांनी सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे माझ्या हातून कळत नकळत देखील चूक होऊन मोदींना मदत होता कामा नये हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मी गेली पाच वर्षे सातत्याने मोदी आणि शहा यांच्या विरूध्द ठाम भूमिकेला आज वंचित आघाडी तडा देत आहे याची खात्री झाल्याने पाठिंबा नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु आपण निवडणूक लढणार नाही असे नाही परंतु पुढे काय करायचे हे अजून ठरविलेले नाही असेही बोलून दाखविले. त्यामुळे कोळशे पाटील येणाऱ्या निवडणुकीला कोणत्या पक्षा तर्फे लढतात की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पहावे लागेल.

वंचित बहुजन आघाडीनें जेव्हा सर्व जागा लढवण्याचे ठरविले तेव्हा त्यांना संघाला आणि भाजपाला मदत करायची असे असेच ही जाणवते. असे मत कोळशे पाटील यांनी बोलून दाखविले. संभाजी नगरच्या जागेवर एमआयएम यांच्या तर्फे इम्तियाज जलील यांच्या नावाची चर्चा सध्या वंचित आघाडी मध्ये चालू झालेली आहे. यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईल परंतु संभाजी नगरच्या जागेवर अपक्ष म्हणून कोळशे पाटील उभे राहणार हे निश्चित आहे. परंतु वंचित आघाडीचा पाठिंबा घेणार नाही असे पत्रकार परिषदेत आपले मत मांडले आहे.

Leave a comment

0.0/5