राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार याच्या पहिल्या भाषणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवलेली दिसून येत होती. मावळ मतदार संघात पार्थ पवार याचे पहिले जाहीर भाषण होते परंतु भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचा साधा कार्यकर्ता सुद्धा पार्थ याच्या पेक्षा चांगले भाषण करू शकतो असेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पार्थ याला लिहून दिलेले मराठी भाषण वाचून बोलताना सुद्धा तो अनेक वेळा अडखळत होता. एकाद्या नव्या कलाकाराला दिलेले भाषण चांगल्या प्रकारे रट्टा मारून बोलू शकतो या कलेची सुद्धा पार्थ पवार याच्याकडे कमी दिसून येत होती.
शरद पवार आणि पार्थ यांचे वडील अजित पवार यांच्याकडे असलेले वक्तृत्वाची कमी पार्थ पवार याच्यात दिसून येत होती. आज मावळ मध्ये पार्थ याला मिळालेली लोकसभेची उमेदवारी फक्त अजित पवार यांच्या हट्टापायी देण्यात आलेली आहे असेच समजते. ज्या पार्थ पवार याला साधे लिहून दिलेले भाषण नीट वाचता येत नाही तो लोकसभेत जनतेचे प्रश्न काय मांडणार, आज महाराष्ट्रात कुशल कौशल्य असणारे शरद पवार यांच्या नातवाला साधा आजोबाचा वक्तृत्वाचा गुण घेता आलेला नाही असेच आज नेटकरी पार्थ पवार यांची खिल्ली उडवत आहे.
” ह्याला लिहिलेले भाषण धड वाचता येत नाही..हा निवडुण येवुन संसदेत काय दिवे लावणार आहे…हा तर राहुल गांधी पेक्षा टिंब…..टिंब…..निघाला..” , ” याच्या इच्छे साठी अख्खा लोकसभा मतदारसंघ ताब्यात कशाला द्यायचा त्याला ग्रामपंचायती पासुन सुरुवात करायला सांगा म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होईल आणि अनुभव सुध्दा येईल” , ” अररारारार…. काय हे… भाव तू खासदार होणार का?? तुझा पेक्षा मी भारी बोलतो… तू स्वतःचे प्रश्न व्यवस्थित मांडू नाही शकत जसनतेचे प्रश्न काय मांडणार… फक्त श्रीरंग अप्पा.. बारणे ” , ” दादाच पोरगं कस बोलतो म्हणून आवर्जून एकल परंतु ह्याने पहिल्या बोलातच विकेट दिली..”, ” काय राव भाषण आमचं दहावीचं पोर चंगल भाषण करतय आणि म्हणे भावी खासदार” अश्या प्रकारे मावळ मधील सुजाण नागरिकांनी आपल्या सूचना पार्थ पवार आणि राष्ट्रवादीला दिलेल्या आहे. यावर येणाऱ्या लोकसभेला मावळ मधील जनता पार्थ पवार सारख्या नवख्या उमेदवाराला संधी देणार का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
1 Comment
Shree
Tumhi mediyawale sangata ki Kaam karayala Navin yuva pidhi pahije, aani ekikade killi udavata ,mang tumhi asa kara sagalich Mhatari umedvaar dya. Mhanje changla kaam karal