Skip to content Skip to footer

नानासाहेब महाडिक यांचा हातकलंगणेतील माने यांना पाठिंब्यामुळे महाडिक गटात खळबळ

नानासाहेब महाडिक यांनी हातकलंगणेत ध्येयाशिल माने यांना पाठींबा जाहीर केल्यामुळे कोल्हापुरातील महादेवराव महाडिक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांची झोपच उडालेली आहे. त्या मतदार संघात शेट्टींना विरोध करणे कोल्हापुरात किती महागात पडू शकते याची कल्पना आल्यामुळे महाडिक यांनी आपला पाठिंबा जाहीर केल्या नंतर नानासाहेब महाडिक यांची काका-पुतण्याने पेठ-वडगाव येथील घर गाठले होते. या सर्व धावपळीची सुरवात कोल्हापुरात झाली. कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरल्या नंतर पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट पेठ-वडगाव गाठले होते.

पेठ-वाडगाव येथे मंत्री सदाभाऊ खोत आधीच येऊन थांबले होते. त्या ठिकाणी मेळाव्यात नानासाहेब महाडिक यांनी माने यांना पाठिंबा जाहीर केला होता. महाडिक यांचे सूत गिरणीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. इकडे माने यांना महाडिकांनी पाठिबा दर्शविला असताना दुसरीकडे आघडीचा धर्म पाळण्यासाठी शेट्टी महाडिकांचा निवडणूक अर्ज भरतेवेळी कोल्हापुरात आले होते. शेट्टी त्यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केलां होता परंतु आघाडीचा नियम पाळण्यासाठी जावं लागेल असे सुद्धा बोलून दाखविले होते. महादेवराव माहाडीक आणि धनंजय महाडिक यांनी तातडीने नानासाहेब महाडिक यांनी भेट घेतलेली होती परंतु अद्याप बैठकीचा तपशील समोर आलेला नाही आहे.

इकडे राजू शेट्टी यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खा. महाडिक यांचा प्रचार करत असताना हातकलांगने मतदार संघात महाडिक यांनी माने यांना आपला पाठिंबा दर्शवल्यामुळे धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच स्वाभिमानाचे जिलाध्यक्ष भगवान काटे यांनी खा.महाडिक यांना फोन करून त्यांची कानउघडणी सुद्धा केली आहे. त्यावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना मला कार्यकर्त्यांनी न जाण्यास बजावले होते तरी मी युतीचा धर्म पळाला खा. महाडिक यांच्या या दुपटीपनाचा कोल्हापुरातील कार्यकर्ते निवडणुकीला समाचार घेतील असे सुद्धा बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5