`रामटेक मधील गटबाजीचा काँग्रेस पक्षला फटका….

रामटेक लोकसभा मतदार संघात कृपाल तुमाने यांना सोडून युतीकडे दुसरा उमेदवार नव्हता ही खासदार कृपाल तुमाने यांची जमेची बाजू, कारण काँग्रेस मध्ये मुकुल वासनिक आणि नितीन राऊत हे स्थानिक नेते इच्छुक असताना सुद्धा काँग्रेसने यांना डावलून काही दिवसापूर्वीच बसपा सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले रीटाइड आयएएस अधिकारी तथा मुंबईत व्यवसायिक असलेले किशोर गजभिये यांना उमेदवारी दिल्यामुळे येन निवडणुकीच्या तोंडावर रामटेक मतदार संघात काँग्रेस पक्षात गटबाजी उफाळून आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीचे पारडे जड झाले असले, तरी मागासवर्गीय आणि बहुजन मतदारांची मते या ठिकाणी निर्णायक आहेत. म्हणून इथे बसपा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. परिणामी या निवडणुकीत मत विभागणी होणार असल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील लढत चुरशीची बनण्याची शक्यता आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत काटोल, सावनेर, हिंगना, उमरेड, कामटी आणि रामटेक असे सहा विधानसभा क्षेत्रे येतात. विदर्भातील रामटेक हा लोकसभा मतदारसंघ आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होते. युतीच्या स्थापनेनंतर त्यांची पहिली विदर्भातील सभा रामटेक येथे झाली होती आणि त्या सभेनंतर शिवसेनेच्या या लोकसभा मतदारसंघाविषयी आस्था वाढल्या. विशेष म्हणजे तेव्हापासून या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार सलग तीन निवडणुकांमध्ये जिंकून आले आहेत.

इथे युतीचे वजन जास्त असण्यामागे काँग्रेसमधील गटबाजी हे प्रमुख कारण आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे दोन चेहरे आहेत. मुकुल वासनीक आणि नितीन राऊत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हे दोघेही इच्छूक होते. त्यातल्या त्यात नितीन राऊत जास्त आग्रही होते. भाजप-सेनेच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात सरकारबद्दल काहीप्रमाणात नाराजी आहे. २०१४ प्रमाणे मोदी लाटही नाही. म्हणून या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. नितीन राऊत तर लोकसभेच्या तयारीलाही लागले होते. मात्र २०१८ मध्ये किशोर गजभिये हे बहुजन समाज पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आले आणि २०१९मध्ये काँग्रेस हायकमांडने गजभिये यांना उमेदवारीही दिली परंतु काँग्रेस पक्षाला अंतर्गत गटबाजीचा फटका बसून कृपाल तुमाने भारी बहुमताने निवडून येतील असा विश्वास राजिक्य विश्लेषकांनी मांडलेला आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here