Skip to content Skip to footer

अमोल कोल्हे यांच्या रैलीत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वानवडी भागात शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांन मध्ये हाणामारी होऊन एकमेकांवर कोयत्याने वार करण्यात आले. त्यामुळे वानवडी भागातील वातावरण काही काळापुरते तापलेले दिसून येत होते. ही घटना रविवारी हडपसर येथील ससाणे हॉल समोर घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अफान फारुख इनामदार, सुफियान फारुख इनामदार, अलताज ऊर्फ गजक्या व इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच चौघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रॅली रविवारी दुपारी ४ वाजता चिंतामणीनगर, सय्यदनगर येथे चालू होती़. यावेळी अन्वर इनामदार आणि अफान इनामदार, सुफियान इनामदार यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन किरकोळ वाद झाला होता़. तो त्यांनी आपआपसात मिटविला़ रॅली संपल्यानंतर अन्वर इनामदार व त्याचे मित्र ताजुउद्दीन पठाण, निझाम शेख व अमनअल्ला सय्यद असे सायंकाळी ७ वाजता ससाणे लॉन्स समोर चहा पित बसले होते़. त्यावेळी सुफियान इनामदार, अफान इनामदार हे हातात कोयत्यासारखे हत्यार व हॉकी स्टीक घेऊन आले़. सुफियान इनामदार याने कोणीही मध्ये यायचे नाही़, कोणाच्या नादी लागला आहे तुम्हाला दाखवितो, असे म्हणून ते सर्व जण अन्वरच्या अंगावर धावून गेले़. सुफियान याने अन्वरवर कोयत्याने वार केला़ तो अन्वर याने हुकविला़ त्यानंतर अलताज याने हॉकी स्टीकने त्यांना मारहाण केली. सध्या सादर प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

Leave a comment

0.0/5