Skip to content Skip to footer

काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद आणि राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचे पिल्लू – पंकजा मुंडे

काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद आणि राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचे पिल्लू अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर केलेली आहे. मंत्री पंकजा मुंडे ह्या नांदेड मध्ये भाजपा-शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड मधील मुखेड या गावी आलेल्या होत्या. मुखेड येथे झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. चिखलीकर यांच्या प्रचारासाठी भाजपा पक्षाने मुखेड येथे सभेचे आयोजन केले होते या सभेला बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, ब्रिटिश भारतात व्यवसाय करण्यासाठी आलेले होते. व्यवसाय करता-करता त्यांनी भारतात १५० वर्ष राज्य केले. त्यांच्या नंतर काँग्रेसने सत्ते मध्ये व्यवसाय केला त्याचमुळे लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास राहिलेला नाही आहे. प्रथम काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नव्हता परंतु आता भाजपा एक सक्षम नेतृत्व म्हणून उभी राहिलेली आहे. तसेच या काँग्रेसने डिव्हाइड अँड रूल ही पॉलिसी वापरली. भाजपा हे अल्पसंख्याक विरुद्ध असल्याची खोटी बतावणी करून देशात फूट पडली आणि ही राष्ट्रवादी त्याचेच एक पिल्लू आहे असे आरोप पंकजा मुंडे यांनी या दोन्ही पक्षावर लगावले होते.

Leave a comment

0.0/5