Skip to content Skip to footer

इतिहास घडणार तो ही चौथ्यांदा जिंकण्याचा – आढळराव पाटील

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील आज मतदान पार पडत आहे.

शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खा. शिवाजीराव आढळराव पाटील चौथ्यांदा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार डॉ अमोल कोल्हे हे यंदा इतिहास घडणार आणि आपण जिंकणार असल्याचं सांगत आहेत. आज मतदान केल्यानंतर आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्या विधानाचा धागा पकडत, शिरूरमध्ये इतिहास घडणार आहे, तो हि मी चौथ्यांदा निवडून येण्याचा असेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना आपण विजयाचा चौकार मारणार असून, आजवर पुणे जिल्ह्यात कोणीही चार वेळा निवडून आले नाही, हा इतिहास घडेल. असा दावा त्यांनी केला आहे. मागील दोन महिण्यापासून होत असलेल्या खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारामुळे पुन्हा एकदा चौकार मारून विजयाची गुढी शिरूर मतदार संघात आपण उभारणार असा विश्वास खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला

Leave a comment

0.0/5