Skip to content Skip to footer

भ्रष्टाचारामुळे भुजबळ जेलमध्ये, आगे आगे देखो होता है क्या – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर तुफान टीका केली. राज ठाकरेंना नाशिकच्या जनतेने महापालिकेची सत्ता दिली. मात्र त्यांनी काहीही कामं केली नाही. कुंभमेळ्या दरम्यान युती सरकारने नाशिकमध्ये कामं केली. राज ठाकरे केवळ फुकटचं श्रेय लाटत आहेत, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. नाशिक येथे महायुतीचे उमेदवात खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा नाशिक येथे आयोजित करण्यात अली होती.

पहिल्या तीन टप्प्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. पवारांनी पॅड घातलं, ग्लोव्ह्ज घातले पण मोदींची गुगली पाहून पॅव्हिलियनमध्ये निघून गेले. त्यांना निवडणुकीत भाड्याने वक्ते आणावे लागतं आहेत. पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं. पण तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नाही, ते गल्लीत बंद पडलं आहे. इंजिनला मोदींनी पछाडलं आहे. राज साहेब तुमचं दुकान नोटबंदीने बंद झाले आहे. आमची कुठेही शाखा नाही अशी यांची परिस्थिती झाली आहे. अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांवर सुद्धा केली.

पुढे छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळांसारखा नटसम्राट महाराष्ट्राने पाहिलेला नाही. भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. आगे आगे देखिये होता है क्या. सध्या बेलवर आहेत, आता तर केस चालणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a comment

0.0/5