Skip to content Skip to footer

नक्षलवाद्यांना सोडणार नाही’ गडचिरोलीत मुख्यमंत्री आक्रमक

गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दाखल होत, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ”गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. या हल्ल्याचा प्रत्युत्तरही नक्षलवाद्यांना दिले जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या शहीद जवानांच्या परिवाराच्या पाठीशी सरकार कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं”.

दरम्यान, शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि वारसांना २५ लाखांची मदत देण्यात येणार आहे. लवकरच राज्य सरकार याबाबतची घोषणा करणार आहे. अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. १ मे रोजी गडचिरोली येथे झालेल्या हल्यात प्राण गमावलेल्या जवानाच्या कटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5