काँग्रेसजनांमध्ये इतका मोदीद्वेष आहे की त्यांना माझ्या हत्येचे स्वप्न पडत आहेत. मात्र मध्य प्रदेशाबरोबरच देशातील जनता माझ्या पाठिशी आहे, याचा त्यांना विसर पडला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या भाषणात केले आहे. बुधवारी एका प्रचारसभेत मोदी बोलत होते. एका दैनिक वृत्रपत्राने यासंदर्भात बातमी दिली होती. काँग्रेस पक्ष घराणेशाही रुजवण्याचा आणि भ्रष्टाचाराचे काम प्रामाणिकपणे करत असून, इतर बाबतीत हा पक्ष अप्रमाणिक आहे. भाजपा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असून, काँग्रेस मात्र घराणेशाहीतील नव्या पिढीच्या
प्रगतीसाठी काम करत आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
विरोधी पक्षातील अनेकांना पंतप्रधान बनण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही विरोधी पक्ष नेताही बनण्याची क्षमता नव्हती. एका कुटुंबाची ५५ वर्षांची सत्ता विरुद्ध चहावाल्याची ५५ महिन्यांची सत्ता यातील योग्य काय आहे हे नीट पारखून एकाची निवड करा, असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनतेला केले आहे. या सभेला जनतेने उस्फुर्त असा प्रतिसाद दिला होता. एकीकडे नरेंद्र मोदी हे महायुती कडून पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून जाहीर झालेले असताना दुसरीकडे ५६ पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंतप्रधान पदासाठी योग्य तो व्यक्ती काँग्रेस आणि त्याच्या आघाडीतील पक्षाला मिळालेला नाही आहे अशीच काही परिस्थिती निर्मण झालेली दिसून येत आहे.