Skip to content Skip to footer

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात….

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी खासदार अशोकराव चव्हाण यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे. यामुळे काँग्रेस पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आलेले दिसून येत आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँगेे्रसने लढवल्या. काँगे्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या आणि उमेदवार्‍यांवरून झालेला गोंधळ निस्तरण्यात चव्हाण यांना यश आले नाही, असे दिल्लीतील कॉग्रेस श्रेष्ठींचे मत आहे.
विधानसभेच्या निवडणुकांसाठी नवीन नेतृत्व देण्याचा विचार दिल्लीत सुरू आहे.

खासदार राजीव सातव आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नावे त्यासाठी पुढे आली आहेत. विदर्भातले सातव हे गांधी घराण्याचे निकटवर्ती आहेत. मात्र, दीर्घकाळ दिल्लीतच असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकीय परीघाबाहेर राहीले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यात आणण्यापेक्षा दिल्लीतच ठेवावे, आणि थोरात यांच्यासारखा सर्वसमावेशक नेता प्रदेशाध्यक्षपदी नेमावा, या मतापर्यन्त श्रेष्ठी आले आहेत. थोरात हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ असून स्वच्छ प्रतिमेचे आहेत. शिवाय कॉग्रेसमधील सर्वच गटांशी त्यांचे जमत असल्याने पक्षाला बळ देण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे श्रेष्ठींचे मत आहे.

Leave a comment

0.0/5