Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांची काकांना ओरळ, काका मला वाचवा ?…..

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राज ठाकरे लोकसभा निकालाने खचले असून त्यांनी आता शरद पवारांना “काका मला वाचवा ” अशी हाक दिली आहे . राज ठाकरे निकालानंतर कोणालाही भेटले नसून आजच जरा सावरल्याचे त्यांच्या स्टाफच्या सूत्रांनी सांगितले आहे .ते त्यांच्या लाडक्या प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या फोन आणि एसएमएस ला पण उत्तर देत नसल्याचे समजते. लोकसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली.

राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी त्यांना फारतर ३० जागा देऊ शकतो अशी अडचण सांगितली आहे . मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतर राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभेला मनसेला बरोबर घ्यावे असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता. परंतु मनसेला आघाडीत घेतल्या नंतर परप्रांतीय मतांवर काय परिणाम होणार याचाही विचार केला जात आहे.

Leave a comment

0.0/5