Skip to content Skip to footer

सोलापुरात एमआयएम नगरसेवकाला काँग्रेस पदाधिकारी यांच्या हत्येप्रकरणी अटक.

सोलापुरात एमआयएम नगरसेवक तथा जिल्हाअध्यक्ष तौफिक शेखला अटक करण्यात आलेली आहे. विजयपूर येथे काँग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. बरेच दिवस ते फरार होते. अखेर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन अटक केलेली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून त्याला अटक केली होती. सोमवारी सकाळी शेखला विजयपूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हत्येच्या आरोपा नंतर तो फरार होता.

काही दिवसापूर्वी रेश्मा पडेकनूर यांनी तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनत चालला होता. विजयपूर येथील कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.

रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडेकनूर यांनी तौफिक शेक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तौफिक शेखने रेश्मा यांच्या कडून १२ लाख उसने घेतले होते. पैसे देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप रेश्मा यांच्या पटीने लावला आहे

Leave a comment

0.0/5