Skip to content Skip to footer

अमरावतीमध्ये टायरच्या गोदामाला आग

अमरावती: गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास येथील मसानगंज भागात असलेल्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आजूबाजूची दोन घरेही जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या सहा फायर टेंडर व फोमच्या साह्याने ही आग नियंत्रणात आणली. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे

. ही कारवाई अग्निशमनाचे उपकेंद्र प्रमुख सय्यद अन्वर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आग कशाने लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a comment

0.0/5