Skip to content Skip to footer

कर्जतला वादळाचा तडाखा, शाळेची पत्रे उडाली, २१ घरांची पडझड

तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या परिसरात आज वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एक शेतकरी जखमी झाला. गाय व शेळी दगावली. घरावरंची पत्रेही उडाल्याने भिंतीही पडल्या आहे. लाईटचे पोल पडले आहे. दुरगांव शाळेचे मोठे नुकसान झाले. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कर्जत तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या गावांना वादळी वा-याचा मोठा तडाखा बसला. थेरवडी येथे चार घरे पडली यामध्ये रंगनाथ बाबू कांबळे हे जखमी झाले. त्यांचेवर राशीन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धालवडी येथे किशोर प्रदीप पवार यांची एक गाय व एक शेळी दगावली.

आज आलेल्या वादळाचा तडाखा दुरगांवला बसला येथील एकवीस घरे पडली. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे चार वर्गाचे व संपूर्ण पडवीचे पत्रे उडाले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामस्थ व शिक्षकांनी डिजिटल बनवली होती. शाळेचे शिक्षक दशरथ देशमुख हे त्यांच्या सहकारी शिक्षकांसह ही घटना समजताच शाळेत आले. शाळेची दुरावस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वादळाचा जोर एवढा होता की लोखंडी पोल वाकले. सिमेंटचे पोल पडले. भगत पाटील वस्तीवर असणारे रोहीत्र. जनावरांचे गोठे तसेच घरे पडली. फळ बागांचे मोठे नुकसान झाले.

दुरगांव येथे २१ घरांची पडझड झाली. एका घरात अवघ्या पंधरा दिवसांची बाळंतीन व बाळ होते. ते घर पडले. शेजारील ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बाळ व बाळंतीन यांना सुखरूप बाहेर काढले. नुकसानीचे पंचनामे करावेत लाभाथीर्ना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी अशोक जायभाय यांनी केली आहे. दुरगांव येथे वादळाचा तडाखा बसला यामध्ये मोठे नुकसान झाले याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक जायभाय यांनी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार वाघ यांना दुर ध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. थेरवडी येथे वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5