Skip to content Skip to footer

तूर डाळीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने कडाडलेल्या डाळींचे भाव गेल्या कमी- कमी होत आहे. यात तूर डाळीचे भाव दोन आठवड्यात ४०० ते ६०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. सोबतच इतरही डाळींचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी कमी होण्यासह वायदे बाजारही नियंत्रणात आल्याने हे भाव घसरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती.

त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटत असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्यात भर म्हणजे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत डाळींचे भाव मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सतत वाढत गेले. यात तूर डाळ तर ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली. ही डाळ प्रती किलो शंभरी गाठणार असे वाटत असतानाच मागणी कमी-कमी होत गेल्याने डाळींचे भाव घटत गेले.

दोन आठवड्यांपासून दिलासदोन आठवड्यांपूर्वी ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटल, उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवरून ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. दोन आठवड्यांपासून डाळींचे भाव कमी-कमी होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
तूर डाळीने वाढविली होती चिंता
पावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत गेली व ती आणखी वधारण्याची चिन्हे होती. मात्र उन्हाळ््यात सुरू असलेली वर्षभराची धान्य खरेदीकमी झाल्याने डाळींची मागणी घटली व भाव कमी होण्यास यामुळे मदत झाली.
सरकार स्थापनेचाही परिणाम
लोकसभा निवडणूक काळात सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने वायदे बाजाराच्या चलतीने बाजार पेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढत गेले. मात्र आता सरकार स्थापनेनंतर वायदेबाजारावर सरकारचे नियंत्रण आल्याने भाव वाढ थांबून डाळी, धान्याचे भाव कमी होत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a comment

0.0/5