Skip to content Skip to footer

शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले,आणखी ९० लाख शेतकऱ्यांना २००० कोटी मिळणार

शिवसेनेमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले,आणखी ९० लाख शेतकऱ्यांना २००० कोटी मिळणार

शिवसेनेने मागील महिन्यात पीक विमा प्रश्नावर आक्रमक होत मोर्चा काढला होता. मुंबईतील बीकेसी मैदानावर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं होतं. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांनी १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यावेत असा इशारा दिला होता. तसेच १५ दिवसात पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असंही ते म्हणाले होते. या इशाऱ्यानंतर पीक विमा कंपन्यांना जाग आल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेच्या या इशारा मोर्चानंतर तब्बल १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रक्कम पीक विम्याच्या स्वरूपात मिळाल्याची माहिती आता समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आंदोलनानंतर झालेल्या परिणामांची आकडेवारी मीडियासमोर सादर केली आहे. यामुळे शिवसेनेच्या पीक विमा मोर्च्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना सणसणीत चपराक बसल्याचं बोललं जात आहे. शिवाय विरोधी पक्षाचं काम शिवसेनेनं करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांनी दिलेल्या रकमेची तसेच आगामी काळात दिल्या जाणाऱ्या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पीक विमा मोर्चामुळे झालेल्या परिणामावर एक नजर:

-खरीप २०१८ मोसमासाठी १ कोटी ४४ लाख शेतकर्‍यांनी अर्ज भरले होते विम्यासाठी, त्यात साधारण ५३ लाख शेतकरी पात्र ठरवले गेले आणि ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले.
-शिवसेनेने पीक विम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकर्‍यांना ९६० कोटी रूपयांची नुकसानभरपाई मिळाली.
-९० लाख शेतकरी जे अपात्र ठरवले गेले त्यांच्यासाठी तरतूद असलेली २ हजार कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे नफा म्हणुन जमा झाली आहे.

दरम्यान वाशीम जिल्ह्यात सोनाली राठोड या महिला शेतकरी यांना दोन एकरला १०२ रुपयांची भरपाई मिळाली तर त्यांनी १८०० रुपयांचा विमा काढला होता. अश्या प्रकारे हा घोटाळा सुरू आहे. शेतकऱ्यांचे पैसे जर विमा कंपन्या खात असतील तर त्यांना कडक शासन झालंच पाहिजे. तसेच ज्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलं आहे त्यांनाही पीक विमा मिळालाच पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्राच्या पीक विमा योजनेत असलेल्या त्रुटी दूर कार्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र दिलं आहे. सरकारने या विमा कंपन्यांना जो पैसा शेतकर्‍यांसाठी दिलेला आहे त्यातला ठराविक हिस्सा नफा म्हणुन विमा कंपन्यांनी ठेवावा पण उरलेले पैसे जसं सरकार सरसकट शेतकर्‍याला नुकसानभरपाई देते तशी ही विम्याची रक्कम दिली गेली पाहिजे असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a comment

0.0/5