Skip to content Skip to footer

पाकच्या नापाक कारवाया सुरूच.

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्‍की करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. परंतू, आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया काही केल्या कमी करताना दिसत नाही.

त्यातच आता भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. यासोबतच 7 लॉंचपॅड तयार करण्यात आले असून 275 दहशतवादी सक्रीय झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.जम्मू काश्‍मीरमधील शांतता भंग करण्यासाठी अफगाण आणि पश्‍तून सैनिकही या दहशतवादी तळात तैनात करण्यात येत आहे. पुढील महिन्यात दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणारी फायनॅन्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स पाकिस्तानच्या भवितव्यावर निर्णय घेणार आहे.

अशाच परिस्थितीत पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. यापूर्वीही 1990 च्या दशकात पाकिस्तानने परदेशी मुलांचा काश्‍मीरमध्ये हिंसा भडकावण्यासाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापर केला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भारताविरोधात काश्‍मीर खोऱ्यात प्रॉक्‍सी वॉरदरम्यान पाकिस्तानने हा डाव खेळला होता. भारताने जेव्हा दशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली तेव्हा पाकिस्तानने आपली रणनिती बदलली.

Leave a comment

0.0/5