Skip to content Skip to footer

विमानसेवा कंपनीच्या ढिसाळ कारभारावर अभिनेत्री संतापली

मुंबईअनेकदा विमान प्रवास करतेवेळी काही अडचणी आल्या, की त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीकडूनच तातडीने काही महत्त्वाची पावलं उचलली जातात. पण, एका लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट पाहता यालाही अपवाद असल्याचं सिद्ध होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका प्रसिद्ध airlineच्या ढिसाळ कारभारावर या अभिनेत्रीने टीका केली आहे.

GoAir या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीवर संतापलेली ही अभिनेत्री आहे, ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर. सदर कंपनीच्या क्र्यू मेबंर्सकडून देण्यात आलेली वागणूक आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर तिने खडे बोल सुनावले आहेत. रविवारी तिने ही पोस्ट केली होती. लखनऊ येथून मुंबईला येत असताना GoAirच्या फ्लाईटसंबंधीच्या अनुभवाचं कथन तिने पोस्टमधून केलं. ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणास अपेक्षेहून अधिक उशीर होणार असल्याचं ठाऊक असतानाही GoAirकडून मात्र याविषयीची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याची बाब तिने उचलून धरली.

‘अरे व्वा…. GoAir! आम्ही तुमच्या g82610 या विमानात बसलो. उड्डाणास ४५ मिनिटं उशीर होणार होता. आम्ही तुमच्या क्र्यूला विचारलं पण, त्यांनी उशीर होण्याची कारण मात्र सांगितलं नाही. त्यानंतर मी तुमच्या ग्राऊंड स्टाफलाही विचारलं. वैमानिक नसल्याचं कारण त्यांनी दिलं. यासाठी जवळपास २० मिनिटं लागतील, असं त्यांनी सांगितलं’, असं लिहित दीपिकाने त्या प्रसंगाची माहिती दिली. मुख्य म्हणजे विमानसेवा कंपनीच्या कोणीही उशीर होत असल्याची सुचना प्रवाशांना देण्याचं सौजन्यही दाखवलं नाही, यावर दीपिकाची नारजी पाहायला मिळाली.
फ्लाईटवर असणाऱ्या संबंधित व्यक्तींना सूचना देण्याचे अधिकार नसल्याचं कारण तिला सांगण्यात आलं. विमान एक तासभर उशीराने आकाझात झेपावणार असल्याचं ठाऊक असतानाही त्यांची ही भूमिका तिला पटली नाही. ज्यावर तिन त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरच उपरोधिक टीका केली.

Leave a comment

0.0/5