Skip to content Skip to footer

स्वस्त आयफोन च्या बहाण्याने फसविले

पुणे – एका नामांकित ऑनलाइन जुन्या वस्तू खरेदी करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावर स्वस्त आयफोन विक्री करत असल्याचे भासवून तरुणाला मोबाईलवर संपर्क साधून महागडा आयफोन स्वस्तात देण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली.

https://maharashtrabulletin.com/iphone-price-cut-down/

तेजस राजाराम ढवळे (वय 24, रा. श्रीपाद सोसायटी, धनकवडी) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तेजसने महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी एका नामांकित ऑनलाइन जुन्या वस्तू खरेदी करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तेजसच्या मोबाईलवर संपर्क साधून स्वस्तात आयफोन देऊ, असे सांगितले. त्याला दहा हजार रुपये खात्यावर जमा करण्यास सांगितले. पैसे जमा झाल्यानंतर आयफोन न देता आर्थिक फसवणूक केली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5