Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सरपंच सिद्धार्थ कासारे यांचा सत्कार

आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सरपंच सिद्धार्थ कासारे यांचा सत्कार

प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत ग्रामपंचायत कोंढेचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक आल्याने सरपंच श्री. सिद्धार्थ कासारे व ग्रामपंचायत सचिव श्री डी.डी.मोरे यांचा सत्कार दापोली मतदार संघाचे आमदार योगेश रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत दिमाखत हा सोहळा ग्रामपंचायतीच्या पटांगणात पार पडला. या सोहळ्यात आमदार योगेश कदम यांनी सरपंच आणि सचिव यांचे अभिनंदन केले तसेच येणाऱ्या काळात कोंढेचा ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतींनीं आपल्या गावचा विकास करावा असे बोलून दाखविले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख श्री. प्रभाकर गोलामडे, मा. पं.स. सभापती श्री. श्रीपत दादा पवार, जि. नियोजन समिती सदस्य श्री. निलेश शेठ, पं.स. सदस्या सौ. वृषाली सुर्वे, सरपंच श्री. सिद्धार्थ कासारे, ग्रामसचिव श्री डी.डी. मोरे, शाखा प्रमुख श्री. विनोद रहाटे, मा.सरपंच श्री. विश्वास खांबे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मारुती चिपळूणकर, शिव सहकार सेनेचे श्री. विवेक खडपकर, श्री. मज्जिद चिकटे, श्री. स्वप्निल सैतवडेकर, श्री. इम्रान खोत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक व गावकरी सुद्धा उपस्थित होते.

शेवरोबा मंदिर वर्धापन दिनाला आमदार योगेश कदम यांची हजेरी

Leave a comment

0.0/5