Skip to content Skip to footer

फडणवीस सरकारने जाहिरातीवर केली लाखोंची उधळपट्टी

फडणवीस सरकारने जाहिरातीवर केली लाखोंची उधळपट्टी

माजी मुख्यमंत्रीण देवेंद्र फडणवीस सरकारने रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचे धक्कादायक आकडे उघड झाले आहेत. फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात जाहिरातीवर प्रचंड खर्च केल्याचं या आकडेवारीवरुन दिसत आहे. विशेष म्हणजे रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचा खर्च २०१३-२०१४ पासून वाढतच गेल्याचं दिसत आहे.

रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५९,९६,२९१ रुपये इतका होता, तो वाढून २०१८-२०१९ साली १ ,८५ ,७२ ,८८७ झाल्याचं दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५३,२५,७३० रुपये होता, तो २०१८-२०१९ साली वाढून तब्बल २,८४,४८,३१७ रुपये झाला आहे.

Leave a comment

0.0/5