Skip to content Skip to footer

मंत्री आदित्य ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थांना तंबी.

मंत्री आदित्य ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थांना तंबी.

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक निर्बंध घातले असल्याचे आदेश जारी केले आहेत. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारने जारी केलेल्या सूचनांचं नागरिक आणि संस्थांनी पालन केले पाहिजे, असे म्हटले आहेत. तसंच कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला कमी लेखू नये, अशी तंबीही दिली आहे.

“केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या सूचनांचं पालन सर्व नागरिक आणि संस्थांनी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने मध्यस्थी करावी, अशी परिस्थिती आहे. कोणत्याही संस्थेने या परिस्थितीला कमी लेखू नये”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती देखील दिली. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत असल्याचेही सांगितले आहे. दरम्यान करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे.

Leave a comment

0.0/5