Skip to content Skip to footer

“फडणवीसांना एवढाच अनुभव असेल तर त्यांना चायनाला पाठवा” – युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा टोला..

“फडणवीसांना एवढाच अनुभव असेल तर त्यांना चायनाला पाठवा” – युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा टोला..

कोरोनावर मात करण्यासाठी शून्य प्रशासकीय अनुभव असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐवजी आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, अशी टीका निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिले होते.

“ह्या असल्या राजकारण्यांना पहिले विलगीकृत Quarantine केले पाहिजे. काय उपयोग शिक्षणाचा जर शहाणपण नसेल? एवढाच अनुभव आहे आपत्ती व्यवस्थापनात तर घेऊन जा तुमच्या नेत्यांना वुहान, स्पेन किंवा इटली मध्ये. तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा, अशी खमखमीत टीका केली होती.

 

 

मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे धडाडीचे निर्णय घेत आहे. आज सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत राज्यतील जनतेला धीर दिलेला आहे. तसेच आज मुख्यमंत्री ठाकरे घेत असलेल्या निर्णयामुळे जनतेचा सुद्धा विश्वास या सरकारवर पहिल्या पेक्षा अधिक प्रमाणात वाढत चालला आहे. हेच कुठेतरी भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खुपसताना दिसत आहे. म्हणूनच या सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजपा नेते सोडत नाहीत.

येणाऱ्या निवडणुकीला पुन्हा एकदा विधानपरिषदेची तिकीट आपल्याला मिळावी या उद्देशाने पुन्हा एकदा डावखरे यांनी फडणवीसांचे कौतुक करणे चालू केले आहे. जे डावखरे राष्ट्रवादी-काँग्रेसचे झाले नाही, ते भाजपाचे आणि फडणवीसांचे कसे होणार? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5